Ramdas Kadam : माझ्या मुलाचा अपघात नाही घातपात करण्याचा डाव; रामदास कदमांचा दावा

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांचा कशेडी घाटात झाला होता भीषण अपघात
Ramdas Kadam : माझ्या मुलाचा अपघात नाही घातपात करण्याचा डाव; रामदास कदमांचा दावा

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आणि आमदार योगेश कदम यांचा भीषण अपघात झाला होता. मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये हा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्यासह चालक आणि ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर आता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर पोलीस गुन्हा दाखल करून चौकशी करत आहेत.

माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, " योगेश कदम यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा प्रयत्न होता. सुदैवाने त्यांची गाडी पोलिसांच्या गाडीला धडकली.यामुळे हा कट फसला." असा दावा त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, "यासंदर्भात पोलीस कसून चौकशी करत आहेत. यावेळी चालकालाही अटक झाली असून त्याने जबाब दिला होता की, ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. पण जेव्हा गाडीची तपासणी केली असता, ब्रेक फेल नसल्याचे निष्पन्न झाले आहे. चालक खोटे बोलत आहे. योगेश कदम यांच्या मागे आणि पुढे पोलिसांची गाडी असतानादेखील डंपरने त्यांच्या गाडीला दीडशे फुट रेटत नेले. ती गाडी आणखी थोडी पुढे गेली असती तर सरळ दरीत कोसळली असती, अशीच योजना असावी असे मला वाटते." असा आरोप त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in