बंगळुरूचे रामेश्वरम कॅफे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत!

बंगळुरूचे प्रतिष्ठित क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) रामेश्वरम कॅफे ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील त्यांचे आऊटलेट सुरू करणार आहे. या नव्या आऊटलेटसाठी ६ फेब्रुवारी रोजी पूजा केली जाणार असून त्यानंतर तीन दिवसांत प्रत्यक्षात मुंबईकर खवय्यांच्या सेवेत दाखल होईल.
बंगळुरूचे रामेश्वरम कॅफे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत!
बंगळुरूचे रामेश्वरम कॅफे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत!
Published on

एस बालकृष्णन / मुंबई

बंगळुरूचे प्रतिष्ठित क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) रामेश्वरम कॅफे ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील त्यांचे आऊटलेट सुरू करणार आहे. या नव्या आऊटलेटसाठी ६ फेब्रुवारी रोजी पूजा केली जाणार असून त्यानंतर तीन दिवसांत प्रत्यक्षात मुंबईकर खवय्यांच्या सेवेत दाखल होईल.

चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील इरॉसमध्ये हे कॅफे आहे. येथेच रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या मालकीचे स्वँक स्वदेश हे दालन आहे. हस्तकला आणि इतर वस्तू येथे उपलब्ध आहेत.

रामेश्वरम कॅफे हे ६,००० चौरस फूटांवर असेल. तळमजल्यावर स्वयंसेवा तर स्वयंपाकघर मेझानाइनवर असेल. शिवाय डायनिंग सुविधा पहिल्या मजल्यावर असून सकाळी ७ ते मध्यरात्रीपर्यंत हे कॅफे सुरू राहिल.

बंगळुरूचे रामेश्वरम कॅफे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत!
बंगळुरूचे रामेश्वरम कॅफे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत!

रामेश्वरम कॅफे २०२१ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर राघवेंद्र राव आणि त्यांची चार्टर्ड अकाऊंटंट पत्नी दिव्या यांनी बंगळुरूमध्ये उघडले होते. वडा सांबार डिप, बटर आणि पोळी इडली, सक्करा पोंगल, पुरी सागु, लसूण भाजलेला डोसा, अक्की रोटी, पुलियोगारे, बिसी बेले बाथ इत्यादींच्या सातत्याने उच्च दर्जासाठी ओळखल्या जाणाऱ्या या कॅफेला कर्नाटकच्या राजधानीतील आयटी क्षेत्रातील आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्या इतर लोकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली.

रामेश्वरम कॅफे नेहमीच खवय्यांच्या गरजा पूर्ण करते. कॅफेच्या उद्घाटनाचे मुंबईतील सर्व उडिपीच्या हॉटेल व्यावसायिकांकडून स्वागत केले जाईल, असे नायक यांनी सांगितले. राव कुटुंबाने अलीकडेच पुण्यातील विमान नगरमध्ये रामेश्वरमचे एक दालन सुरू केले. उद्घाटनाच्या दिवशी शेकडो पुणेकर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लांब रांगेत होते.

logo
marathi.freepressjournal.in