कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी यांचे निधन

मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे, साहित्य, नाटक आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी यांचे निधन झाले.
कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी यांचे निधन
Published on

मुंबई : मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे, साहित्य, नाटक आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी (९२) यांचे रविवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.

रामकृष्ण केणी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते विचारवंत, साहित्यिक आणि समाजाच्या वेदनांना शब्द देणारे प्रभावी नाटककार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित “युगपुरुष” हे नाटक रंगमंचावर आणून त्यांनी दलित, वंचित आणि कोळी समाजाला सांस्कृतिक व्यासपीठावर आवाज दिला. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, शोषितांच्या बाजूने निर्भीडपणे बोलणे हीच त्यांची ओळख होती.

मुंबईतील धारावी विभागातून ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई महापालिकेत त्यांनी सभागृह नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली होते. मुंबईत शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या बळकट होण्यात त्यांचे मोठे योगदान होते. महाराष्ट्रातील विविध समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे ते संस्थापकीय नेते होते.

logo
marathi.freepressjournal.in