गुन्हा रद्द करण्यासाठी राणे पितापुत्रांची केली उच्च न्यायालयात याचिका दाखल

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनने ९ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती.
गुन्हा रद्द करण्यासाठी राणे पितापुत्रांची केली उच्च न्यायालयात याचिका दाखल
Published on

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आक्षेपार्ह वक्तव्य करून सर्वत्र राळ उडवून दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याने राणे पितापुत्रांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने वेळ मागून घेतल्याने न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने सुनावणी २९ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनने ९ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधाने केल्याबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द कररण्यासाठी राणे पितापुत्रांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in