राणी बाग  झाली पर्यटकांनी ओव्हर फ्लो;दिवसभरात २५ हजार पर्यटक

राणी बाग झाली पर्यटकांनी ओव्हर फ्लो;दिवसभरात २५ हजार पर्यटक

वाघाची डरकाळी, पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी येत असतात. रोज ८ ते १० पर्यटक भेट देतात

दिवाळी सुट्टी असल्याने पर्यटकांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाला पसंती दिली. मंगळवार, २५ ऑक्टोबर या एका दिवशी २५ हजार २९ पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्य गेट एक तासासाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान, या एका दिवसात ९ लाख ५७ हजार ८२५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राणी बागेतील वाघाची डरकाळी, पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी येत असतात. रोज ८ ते १० पर्यटक भेट देतात. परंतु सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १५ ते २० हजारांच्या घरात जाते. सध्या दिवाळी सणानिमित्त शाळांना सुट्टी असून खासगी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे राणी बागेतील शिवा व शिवानी अस्वलाच्या जोडीची धमाल मस्ती, विविध पशुपक्षी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दिवाळी सणानिमित्त पर्यटकांची गर्दी झाल्याने अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्य गेट एक तासासाठी बंद करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in