राज्यात लम्पीचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राणीबाग सावध

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील जनावरास लम्पीची लागण झाल्याचे निदान ४ ऑगस्ट रोजी झाले.
राज्यात लम्पीचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राणीबाग सावध

राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. तर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाने आता वाघ, बिबट्या, तरस आणि कोल्ह्यांना बीफऐवजी फ्रोझन बीफ देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत प्राणिसंग्रहालयात चार दिवसांना पुरेल इतके बीफ साठवून ठेवण्यात आले आहे; मात्र लम्पीचा प्रसार मुंबईत झाल्यास या प्राण्यांना फ्रोझन बीफ देण्यात येईल, असे राणीबाग प्राणिसंग्रहालयाच्या डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील जनावरास लम्पीची लागण झाल्याचे निदान ४ ऑगस्ट रोजी झाले. यानंतर लम्पीच्या प्रसारात जिल्ह्यात तब्बल १८५ जनावरांना लागण झाली. यामध्ये २९ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला. राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राणीबाग प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सद्य:स्थितीत वाघ, बिबट्या, तरस आणि कोल्ह्याच्या जोडीला बीफ आणि चिकनचा आहार दिला जातो; मात्र जनावरांना लागण होणाऱ्या लम्पी आजाराचा मुंबईत अलीकडेच शिरकाव झाला. प्राण्यांसाठी लागणारे बीफ देवनार पशुवध गृहातून आणले जाते. या ठिकाणच्या प्राण्यांसाठी दिवसाला ४० ते ५० किलो बीफ लागते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in