नाताळनिमित्त राणीबाग जनतेसाठी खुली राहणार

नाताळनिमित्त बुधवार २५ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटी असली तरी भायखळा येथील जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय( राणीची बाग) पर्यटकांसाठी खुले राहणार आहे.
नाताळनिमित्त राणीबाग जनतेसाठी खुली राहणार
Published on

मुंबई : नाताळनिमित्त बुधवार २५ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटी असली तरी भायखळा येथील जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय( राणीची बाग) पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी - गुरुवार, २६ डिसेंबर रोजी बंद असेल, असे मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

या ठरावानुसार बुधवार, २५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळ (ख्रिसमस) निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in