
मुंबई : साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असणारी राणीची बाग बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘श्री गणेश चतुर्थी’ला जनतेकरिता खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ‘श्री गणेश चतुर्थी’ निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.