रणवीर अलाहाबादियाचे मुंबईतील घर बंद!

पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या विवादित वक्तव्याच्या चौकशीसाठी मुंबई आणि आसाम पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी भेट दिली, मात्र त्यांचे घर बंद आढळले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
रणवीर अलाहाबादियाचे मुंबईतील घर बंद!
@tweet_braj
Published on

मुंबई : पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या विवादित वक्तव्याच्या चौकशीसाठी मुंबई आणि आसाम पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी भेट दिली, मात्र त्यांचे घर बंद आढळले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

यूट्यूब चॅनेलसाठी प्रसिद्ध असलेल्या अलाहाबादियाने विनोदी कलाकार समय रैना याच्या आता हटवलेल्या यूट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह विधाने केली होती. या अश्लील आणि निंदनीय वक्तव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला असून अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आणि शुक्रवारी वर्सोवा येथील त्यांच्या फ्लॅटवर गेले असता ते बंद आढळले. अलाहाबादियाला गुरुवारी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र तो हजर झाला नाही. त्यामुळे दुसरे समन्स काढण्यात आले असून त्यांना शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. रणवीरने स्वतःच्या घरी जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने ती नाकारली.

logo
marathi.freepressjournal.in