भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार; फेसबुकवरील जाहिरात महागात पडली, अनेक महिला बाबाच्या ‘जाळ्यात’

पीडितेचा हात बघत जादूटोणा करत राहू दोषाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगत त्याचे निराकरण करण्याचे सांगून पीडित महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार...
बांसवाड राजस्थान बलात्कार
बांसवाड राजस्थान बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

भाईंंदर : मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत एका ४० वर्षीय पीडित महिलेला घरगुती त्रास होत असल्याने तिने ऑनलाईन फेसबुक पेजवरील हस्तरेखा विषयतज्ज्ञ या वेबसाईटवर जाहिरात पाहून २०२० साली भोंदू बाबाशी संपर्क साधला होता.

त्यांनी पीडितेचा हात बघत जादूटोणा करत राहू दोषाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगत त्याचे निराकरण करण्याचे सांगून पीडित महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केला. या प्रकरणी भोंदू बाबावर नया नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ लातूर जिल्ह्यातील विनोद पंडित ऊर्फ संतोष जगन्नाथ पोद्दार (५५) याने त्याला काळी विद्या, जादूटोणा अवगत +असल्याचे पीडितेला सांगून त्याचा वेळोवळी वापर करून वैवाहिक संसार जीवनातील वाद सुरळीत करून पीडितेच्या पत्रिकेतील राहू दोष दूर करण्याच्या बहाण्याने तिच्याशी जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबध केले. तसेच याच दरम्यान पीडितेचे नकळत भोंदू बाबांनी काढलेले आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हॉटसॲपव्दारे त्यांना पाठविले. सदरचे व्हिडीओ व फोटो हे सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देवून सतत अशा प्रकारचे मॅसेजेस पाठवून पीडितेला १० डिसेंबर २०२० ते ११ एप्रिल २०२४ पर्यंत प्रचंड मानसिक त्रास दिला.

याप्रकरणी अखेर असह्य झालेल्या पीडितेने भोंदू बाबाविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान सदर आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई हे करत आहेत.

नया नगर पोलिसांकडून आवाहन

अनेक पीडित महिला या बाबाच्या ‘जाळ्यात’असून आरोपी पंडितच्या मोबाईलमध्ये पोलिसांना तीन महिलांची अश्लील छायाचित्रे आढळली आहेत. त्याने अनेक महिलांना आपले शिकार बनवल्याची शक्यता नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई यांनी व्यक्त केली आहे. ज्या महिलांची ढोंगी बाबा पंडितने फसवणूक केली असेल त्याने नया नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नया नगर पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे विनोद पंडित या ढोंगी बाबावर २०१९ मध्ये देखील नया नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in