भटक्या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

भटक्या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पाहता कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर भर दिला जात आहे; मात्र निर्बीजीकरणानंतरही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१४मध्ये केलेल्या गणनेत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२ इतकी होती. त्यानंतर कुत्र्यांचे निर्बीजीकरण करूनही गेल्या आठ वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या ०२,०१,०४९नी वाढली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर होणारा खर्च व्यर्थ होत असल्याचे दिसून येते.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर भर देते. तरीही मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्य:स्थितीत मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या दोन लाख ९६ हजार आहे. २०१४ नंतर भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यात येणार आहे. जानेवारी २०२३मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली जाणार असल्याची माहिती देवनार पशुवैद्यकीय महाव्यवस्थापक ए. के. पठाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in