१ सप्टेंबरपासून रेशन कार्डधारकांची पडताळणी होणार

धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात.
१ सप्टेंबरपासून रेशन कार्डधारकांची पडताळणी होणार
Published on

गरीब उपाशी राहू नये म्हणून सरकार रेशन कार्ड यंत्रणा राबवते. त्यामुळे त्यांना स्वस्त दरात धान्य मिळते. आता या योजनेत मोठे उत्पन्नधारकही सहभागी होत आहेत. त्यामुळे गरिबांना धान्य मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न वाढूनही जे रेशनधान्य घेत असलेल्या धारकांचे धान्य बंद होणार आहे. येत्या १ सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात. त्यामुळे जे गरजू आहेत, त्यांना हे धान्य मिळत नाही. स्वस्त धान्य खरेदी करून ते विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत. माणसांना अन्न मिळत नाही. काही जण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचे उघड झाले आहे. तरीही हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत.

फौजदारी गुन्हे होणार दाखल

१ सप्टेंबरपासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुली केली जाणार असल्याची माहिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in