मुंबई : BBQ Nation रेस्टॉरंटमधील जीवघेणा प्रकार; शाकाहारी जेवणात सापडला उंदीर, झुरळ

तातडीने बार्बेक्यू नेशनच्या अधिकृत ई-मेल आयडीवर मेल करून तक्रार केली
मुंबई : BBQ Nation रेस्टॉरंटमधील जीवघेणा प्रकार; शाकाहारी जेवणात सापडला उंदीर, झुरळ

स्वप्नील मिश्रा/मुंबई : ‘डोंगर पोखरून उंदीर सापडला’, अशी मराठीत म्हण आहे. आता एका ग्राहकाने हॉटेलमधून शाकाहारी जेवण मागवले. त्याच्या जेवणात चक्क मेलेला उंदीर, झुरळ सापडले. मुंबईतील बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंटने हा जीवघेणा प्रकार केला.

८ जानेवारी रोजी राजीव शुक्ला यांनी जेवण मागवले. शुक्ला हे वकील असून ते मुंबईला फिरायला आले होते. ते वरळीच्या बार्बेक्यू नेशनमधून कायम जेवण मागवत होते. ८ जानेवारीला त्यांनी जेवण आल्यानंतर खायला सुरुवात केली. दाल मखनी खाल्ल्यानंतर त्यात त्यांना मेलेला उंदीर व भाजीत झुरळ आढळले. त्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करावे लागले.

ते म्हणाले की, मी प्रयागराजचा असून ब्राह्मण आहे. मी बार्बेक्यू नेशनमधून ऑनलाईन जेवण मागवले. त्यात उंदीर व झुरळ आढळल्याने मला धक्काच बसला. माझ्या पोटात दुखू लागले.

मी तातडीने बार्बेक्यू नेशनच्या अधिकृत ई-मेल आयडीवर मेल करून तक्रार केली. अन्नात भेसळ झाल्याचा प्रकार मी त्यांच्या निदर्शनास आणला. दुर्दैवाने मी बहुतांशी अन्न खाल्ले होते. मी शाकाहारी असताना मांस खाल्ले ही बाब माझ्या मनाला लागून राहिली. मला उलट्या होऊ लागल्या. माझे डोके गरगरू लागले. माझी अन्नावरील वासना उडाली. मी डाळीतील मेलेल्या उंदराची छायाचित्रेही पाठवली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले.

शुक्ला म्हणाले की, रेस्टॉरंटच्या मॅनेजरने माझ्या मेलला प्रतिसाद दिला. मात्र मला रुग्णालयात तो भेटायला आला नाही. आता सहा दिवसांनंतर नागपाडा पोलीस ठाण्यात बार्बेक्यू नेशनच्या मालक, व्यवस्थापक व शेफविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र तो होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in