रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; केला होता आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता
रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; केला होता आत्मदहनाचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या २५ सहकाऱ्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर त्यांनी तुरुगांतही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला होता. गेल्या २ दिवसांपासून त्यांचे तुरुंगातच अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविकांत तुपकर यांनी सरकारला १० फेब्रुवारीपर्यंत दिलेला कापूस, सोयाबीन आणि पीक विमा या प्रश्नांवर अल्टिमेटम दिला होता, तो अल्टिमेटम संपला. त्याआधी चार दिवसांपासून तुपकर भूमिगत होते. ११ फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी जमा झाले होते. यावेळी तुपकर पोलिसांच्या वेशात आले आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. मात्र, पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला होता.

logo
marathi.freepressjournal.in