ट्रॉमा रुग्णालयात कार्डियाक विभाग सुरू करा; आमदार रविंद्र वायकरांची पालिका प्रशासनाला सूचना

ट्रॉमा रुग्णालयात देण्यात येणार्‍या विविध आरोग्य सेवांबाबत रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या.
ट्रॉमा रुग्णालयात कार्डियाक विभाग सुरू करा; आमदार रविंद्र वायकरांची पालिका प्रशासनाला सूचना

हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राबरोबरच अन्य जवळच्या भागातील गोरगरीब जनतेचे आधारास्तंभ असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (ट्रॉमा) मनपा रुग्णालयात तात्काळ कार्डीयाक विभाग सुरू करण्यात यावा तसा प्रस्ताव तयार करुन तो मनपा आयुक्तांकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुर्‍हाडे यांना दिल्या.

ट्रॉमा रुग्णालयात देण्यात येणार्‍या विविध आरोग्य सेवांबाबत रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. यावर मार्ग काढण्यासाठी वायकर यांनी सोमवारी संबंधित अधिकार्‍यांसमहेत बैठकीचे आयोजन केले होते. विविध आजारांवर उपचारासाठी या रुग्णालयात गर्दी असते. परंतु एवढ्या मोठ्या रुग्णालयात कार्डीयाक विभाग नसल्याने आपत्कालिन प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना खासगी रुग्णालयात अथवा कुपर रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. यामुळे बर्‍याच अंशी उपचारास विलंब झाल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे ट्रॉमा रुग्णालयात कार्डीयाक विभाग सुरू करण्यात यावा, अशी वायकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in