
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकांकडून कर्जवसुली करण्यासाठी ज्या रिकव्हरी एजंट नेमणूक केली जाईल. त्यांची संपूर्ण माहिती कर्जदाराला देणे आवश्यक असल्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. कर्जवसुली संबंधित अनेक तक्रारी आल्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधित त्यांनी नियमावली जाहीर केली आहे.
आरबीआयने डिजिटल कर्जासंबंधिच्या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात एक माहिती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, कर्ज थकीत झाल्यास व कर्जदाराकडून वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंटची नियुक्ती केली असल्यास, डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी वसुली एजंटशी संपर्क साधण्याआधी त्यांचा फोन नंबरपासून सर्व माहिती द्यावी. वसुली एजंटची सर्व माहिती ही ईमेल आणि एसएसएसद्वारे कर्जदारांना देण्यात यावी. डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकांनी नियुक्त केलेल्या अधिकृत वसुली एजंटचे नाव कर्जदारांना देण्यात येईल. या कर्जाची परतफेड न झाल्यास संबंधित वसुली एजंट ग्राहकांशी संपर्क साधतील अशी माहिती कर्जदाराना आधीच दिली पाहिजे.