आरबीआयने दिला महागाईच्या व्याजदराचा आंदाज

रशिया-युक्रेन युद्ध लांबल्याने जागतिक स्तरावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर मोठा दबाव वाढला
आरबीआयने दिला महागाईच्या व्याजदराचा आंदाज
Published on

भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरबीआयने महागाईचा व्याजदर ५.७ वरून ६.७ टक्के अंदाजित केला आहे, अशी माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

रशिया-युक्रेन युद्ध लांबल्याने जागतिक स्तरावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर मोठा दबाव वाढला आहे. येते तीन तिमाही महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जून तिमाहीत महगाईचा दर ६.३ ऐवजी ७.५ टक्के, जुलै ते सप्टेंबर दरम्यान ७.४ टक्के तर ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ६.३ टक्के तर जानेवारी-मार्च दरम्यान महागाईचा दर ५.१ वरून ५.८ टक्के राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली.

सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता, जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर सहा टक्क्यांच्या पुढे आहे. याचप्रकारे एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता.

धान्याच्या महागाईबद्दल बोलायचं गेल्यास मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवरुन ८.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. मे महिन्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान महागाई दर वाढत राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे सरकराने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेवरील कर, विमान इंधनाचे दर कमी करण्यासोबतच अनेक पावलं उचलली आहेत.

जीडीपीचा ७.२ टक्के राहील

२०२२-२३ मध्ये जीडीपीचा दर ७.२ टक्के कायम ठेवला आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी व्याजदर १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के, चौथ्या तिमाहीत तो ४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. मान्सून यंदा सामान्य राहील, असे दास यांनी सांगितले.

येत्या काही दिवसात क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक केले जाऊ शकते. यामुळे व्यवहार अधिक सोपे होतील. प्रारंभीच्या काळात रुपे क्रेडिट कार्डापासून त्याची सुरुवात होईल. सध्या यूपीआय वापरकर्त्यांना डेबिट कार्ड व बचत व करंट अकाऊंटला जोडून व्यवहार करता येतो. क्रेडिट कार्डला यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआय याबाबतचे आदेश दिले जातील. मात्र, क्रेडिट कार्डला यूपीआयशी व्यवहाराशी संलग्न केल्याने एमडीआर लागू होईल किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in