आरबीआयने केली आठ सहकारी बँकांवर कारवाई; राज्यातील तीन बँकांना दंड

आरबीआयने सहकारी बँकांसाठी घालून दिलेले नियमांचे पालन न केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ लाख रुपयांचा दंड केलाय
आरबीआयने केली आठ सहकारी बँकांवर कारवाई; राज्यातील तीन बँकांना दंड

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील एकूण ८ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. सर्व बँकांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ३ सहकारी बँकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, द यवतमाळ को ऑपरेटिव्ह बँक ली., वरुड को-ऑपरेटिव्ह बँक लि. या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयने सहकारी बँकांसाठी घालून दिलेले नियमांचे पालन न केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ लाख रुपयांचा दंड केलाय. केवायसी संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाखांचा तर वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख रुपयांचा दंड केला आहे.

महाराष्ट्रातील या तीन बँकांसोबतच गुजरातमधील मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ४० लाख रुपये, मध्य प्रदेशमधील जिल्हा सहकारी बँक, छत्तीसगडमधील राज्य सहकारी बँक, गुना येथील एका सहकारी तर पणजी येथील गोवा राज्या सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in