सिनेट निवडणूक प्रक्रियेला नव्याने आव्हान ;३० नोव्हेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश द्या

विद्यापिठाच्या या निवडणुक कार्यक्रमालाच देवरे यांनी आक्षेप धेतला आहे.
सिनेट निवडणूक प्रक्रियेला नव्याने आव्हान ;३० नोव्हेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश द्या

मुंबई : सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात अवमान याचिका दाखल झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. सागर देवरे यांनी नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ३० नोव्हेंबरपूर्वी निवडणुका घेण्याबाबत विद्यापीठाला निर्देश द्या, अशी विनंती करणाऱ्या या याचिकेवर द्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विद्यापिठाच्या या निवडणुक कार्यक्रमालाच देवरे यांनी आक्षेप धेतला आहे. विद्यापीठाकडून निवडणूक कार्यक्रमाला जाणूनबुजून विलंब केला जात असून, ३० नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in