राऊत यांना समोरासमोर प्रत्युत्तर द्यायला तयार, १०० कोटींच्या गायब फंडाबाबत स्पष्टीकरण दयावे- अमेय घोले, राहुल कनाल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. तथ्यहीन आहेत.
राऊत यांना समोरासमोर प्रत्युत्तर द्यायला तयार, १०० कोटींच्या गायब फंडाबाबत स्पष्टीकरण दयावे- अमेय घोले, राहुल कनाल

प्रतिनिधी/मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. तथ्यहीन आहेत. मी १० महिने आरोग्य समिती अध्यक्ष असताना इतर खूप लोकांवर मग ते महापौर असोत, किंवा इतर कोणीही असोत. त्यांच्यावर आरोप व्हायचे परंतु त्या काळात व नंतरच्या काळात, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि नंतर युती सरकार आल्यानंतर, दोन्ही कार्यकाळात माझ्यावर कुठलाही आरोप करण्यात आला नव्हता. किंवा कुठल्याही एजन्सीची केस माझ्यावर नाही आहे. मी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी पक्षात आलेलो असल्याचे शिवसेना युवासेना सरचिटणीस अमेय घोले यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात लोक मरत होते तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. तेव्हा संजय राउत कुठे होते असा सवाल युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी केला. वरळीतील हिल टॉप हॉटेलमध्ये कोणता कारकून काम करत होता, ९० ते १०० कोटींचा फंड कुठे गायब झाला याचे उत्तर संजय राऊत यांनी जनतेसमोर द्यावे. एकाच पत्रकारपरिषदेत समोरासमोर बसून उत्तर दयायला आम्ही तयार आहोत. आम्ही चुकीचे काम केल्याचे सिदध झाले तर राजीनामा देउन राजकारण सोडू. संजय राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का? असे आव्हानही दोघांनी दिले.

आम्हाला संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे, जे लोक यांचे दौरे सांभाळायचे ते सुनील बाळा कदम, सुजित पाटकर यांचे बँक अकाउंट मध्ये ट्रान्स्फर आलेले आहेत. जर आम्ही खोटे बोलत असू, तर तुम्ही सीसी टीव्ही कव्हरेज शोधा. कोविडच्या काळात व कोविड नंतर हे लोक महापौर बंगल्यावर का जायचे? कुठल्या अधिकाराने जायचे? किती अधिकाऱ्यांना राऊत साहेबांचे फोन गेलेत, हे रेकॉर्ड वर काढा, सगळ्यांचे रेकॉर्डस् आहेत. सुजित पाटकर, सुनील बाळा कदम किंवा इतर कुणीही असोत. या घोटाळ्यात जे जे लोक सापडले आहेत. जे ईडी व इतर संस्थांनी सिद्ध केलेले आहेत. यात आमची नावे कुठेही नाहीत. फक्त खिचडी नाही तर तर इतर मेडिकल एजन्सीज आहेत त्यांची तुम्ही काढा. यात सुनील बाळा कदम आणि सुजित पाटकर कुठे कुठे सहभागी आहेत ते कळेल, अशा शब्दांत अमेय घोले यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.

.. तर खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहात का?

रेमिडिसवेअर चा घोटाळा असो, बॉडी बॅग घोटाळा असो किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. आमच्यात हे धाडस आहे. पण संजय राऊत यांच्यात हे धाडस आहे का? जर धाडस असेल तर तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांची शपथ घ्यावी की जर आमचे नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले नाही, तर राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा द्याल. असे बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा. पण जर तुम्ही खरे बोलत आहात अशी तुमची खात्री असेल, तर तुम्ही जनतेसमोर मीडियासमोर येऊन बोला, आमच्याविरोधात पुरावे सादर करा. जर आम्ही दोषी आढळलो, तर आम्ही कायदेशीर कारवाईला सामोरे जायला सुद्धा तयार आहोत. पण तुम्ही चुकीचे ठरलात तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहात का? असा सवाल राहुल कनाल यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in