भूषण गगराणी
भूषण गगराणीसंग्रहित छायाचित्र

'रिअल इस्टेट स्टीयरिंग कमिटी' स्थापन होणार; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली मान्यता

या समितीत क्रेडाई-एमसीएचआय, नरेडको महाराष्ट्र, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्टस् ऍंड टाऊन प्लॅनर्स असोसिएशन (पीईएटीए) आणि बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशन (बीडीए) या संस्थांचे प्रतिनिधी तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ‘रिअल इस्टेट स्टीयरिंग कमिटी’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या समितीत क्रेडाई-एमसीएचआय, नरेडको महाराष्ट्र, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्टस् ऍंड टाऊन प्लॅनर्स असोसिएशन (पीईएटीए) आणि बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशन (बीडीए) या संस्थांचे प्रतिनिधी तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

‘रिअल इस्टेट स्टीयरिंग कमिटी’ स्थापन झाल्यावर या समितीद्वारे बीएमसी ईओडीबी २.० (ईझ ऑफ डुईंग बिझनेस २) सुरू करणार असून, बांधकाम आराखड्यांच्या मंजुरी प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in