सांगितिक नादब्रह्माचा चित्रांतून साक्षात्कार

१८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रदर्शन सर्व रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे
सांगितिक नादब्रह्माचा चित्रांतून साक्षात्कार

चित्रकार यज्ञेश शिरवडकर यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रदर्शन सर्व रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे. प्रस्तुत चित्रप्रदर्शनात चित्रकाराने ॲक्रीलिक रंगाच्या कलात्मक लेपनातून साकारलेली विविधलक्षी अनोखी चित्रे मानवी आयुष्यातील संगीताचे व तशा प्रकारच्या नादब्रह्माचा असणारे अढळ स्थान एका अभूतपूर्व शैलीतील सौंदर्यपूर्ण सादरीकरणातून स्पष्टपणे अधोरेखित केले आहेत.

चित्रप्रदर्शनात ठेवलेली चित्रे प्रामुख्याने मानवी जीवनात असणारे संगीताचे अढळ स्थान व त्यापासून त्यास होणारा दैवी सुखाचा, शांतीचा व स्वर्गतुल्य अमृतमय आनंदाचा एक बोलका आविष्कार फार प्रकर्षाने दर्शवितात. मानवी मनास हल्लीच्या धावपळीच्या व गतिमान तसेच व्याधीयुक्त जीवनातील विविध ताणतणाव व मनोवेदना वाढविणारी मनस्थिती ह्यांचा वारंवार अनुभव येत असतो. यापासून मुक्ती मिळण्यासाठी व निरामय सुखी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी संगीत त्याला योग्य प्रकारे सहाय्य/मदत करते. ॲक्रीलिकरंगांच्या कलात्मक व सौंदर्यपूर्ण लेपनातून त्यांनी रंगांचे विविध स्तर आणि त्यातून साकारणारी आश्वासक अनुभूती ह्यांचे एक बोलके चित्रमय दर्शन सर्वांना येथे घडविले आहे. विविध वाद्ये वाजवताना व त्या दैवी सुरांच्या नादमय झंकारातून साकारणारे नादब्रह्म आणि त्याची अनुभूती सर्वाना देताना वाद्य वादकांची असणारे एकाग्रता व एकतानता,त्यांच्या विविध भावमुद्रा, त्या सप्तसुरांच्या व सप्तरंगांची नादमय व कलात्मक समन्वयातून साकारणारे अभूतपूर्व दैवी भावविश्व आणि त्या नादमय आविष्कारांपासून सर्वांस लाभणारी मनःशांती, दैवी आनंद व निरामय सुख ह्यांचा एका सुरेख संगम यज्ञेश शिरवडकर ह्यांनी आपल्या अद्भुतरम्य कलाविष्कारातून साधला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in