एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालक भरती

५ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे
 एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालक भरती

संपकाळात चालकांविना सर्वसामान्य एसटी प्रवाशांचे हाल झाले. या कालावधीत एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालक भरती करून राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर संपानंतर कंत्राटी चालकांना कमी करत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांतील मुदत संपलेल्या चालकांना मुदत वाढ देखील देण्यात आली. दरम्यान, पुन्हा ५ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्यात २९ हजारांपेक्षा जास्त एसटी चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते.

चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in