चंदन तस्कर साटमला कोर्टाचा दणका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

कुख्यात लाल चंदन तस्कर अजित साटम याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. डागा यांनी २०१० ते २०११ दरम्यान ८३९ मेट्रिक टन लाकडाच्या तस्करीतून मिळालेल्या पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून साटम याला दोषमुक्त करण्यास नकार देत त्याचा अर्ज फेटाळून लावला.
चंदन तस्कर साटमला कोर्टाचा दणका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला
Published on

मुंबई : कुख्यात लाल चंदन तस्कर अजित साटम याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. डागा यांनी २०१० ते २०११ दरम्यान ८३९ मेट्रिक टन लाकडाच्या तस्करीतून मिळालेल्या पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून साटम याला दोषमुक्त करण्यास नकार देत त्याचा अर्ज फेटाळून लावला.

चंदन तस्करीतून कमावलेल्या पैशांची अफरातफर करण्यात अजित साटमचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात साटमने गुन्ह्यातून पैसे मिळाले असल्याचे स्वतः कबूल केले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, साटमने बेकायदेशीर व्यापारातून ४० कोटी रुपये रोख कमावले. नंतर विविध आर्थिक व्यवहारांद्वारे रकमेचे लाँड्रिंग केले. त्याच्यावर रोख रक्कम, चेक आणि आरटीजीएस ट्रान्सफरमध्ये रूपांतरित केल्याचा तसेच ती रक्कम कायदेशीर उत्पन्नाचे स्वरूप देण्यासाठी बँक खात्यांमध्ये जमा केल्याचा आरोप आहे.

logo
marathi.freepressjournal.in