मुंबईतील ३१ मंडईंचा पुनर्विकास; सहा मंडईंचे काम प्रगतिपथावर, दोघांचे बांधकाम पूर्ण

मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारित ९२ किरकोळ मंड्या तर समायोजन आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या १०८ मंड्या आहेत.
मुंबईतील ३१ मंडईंचा पुनर्विकास; सहा मंडईंचे काम प्रगतिपथावर, दोघांचे बांधकाम पूर्ण

मुंबई : मुंबईतील जुन्या झालेल्या ३१ मंड्याचा पुनर्विकास केला जातो आहे. पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ११ मंड्यांच्या पुनर्विकासात महात्मा ज्योतिबा फुले मंडईचे ३५ टक्के काम, शिरोडकर मंडईचे २० टक्के, बाबू गेणू मंडईचे ८० टक्के व टोपीवाला मंडईचे ५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर सात मंड्यांचे आराखडे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. तर २० मंड्यांचा पुनर्विकास मंडई असोसिएशनने नेमलेल्या खासगी विकासामार्फत केला जातो आहे. यात ८ मंड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर दोन मंड्यांचे बांधकाम प्रगती पथावर आहे. पालिका यासाठी १०५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारित ९२ किरकोळ मंड्या तर समायोजन आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या १०८ मंड्या आहेत. तसेच १६ खासगी मंड्या असून या सर्व मंड्यांमध्ये एकूण १८,७६० परवानाधारक आहेत. जुन्या व धोकादायक झालेल्या ११ मंड्यांच्या पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. यात चार मंड्यांचे काम सुरु असून माझगाव परिसरातील बाबू गेणू मंडईचे काम प्रगतीपथावर असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर परळच्या शिरोडकर मंडईचे काम २० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर सात मंड्यांचे आराखडे मंजुरीच्या प्रक्रियेत असून मंजुरी मिळाल्यानंतर या मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कुलाबा मंडई, परळगाव मंडई, हेमंत मांजरेकर मंडई, मुलुंड पूर्व मंडई यांच्या व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.

२० मंडयांचा पुनर्विकास खासगी विकासामार्फत

२० मंड्यांचा पुनर्विकास मंडई असोसिएशनने नेमलेल्या खासगी विकासामार्फत विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली २०३४ मधील विनियम ३३(२१) (सी) अन्वये केला जात असून ८ मंड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर दोन मंड्यांचे बांधकाम प्रगती पथावर आहे.

मंड्यांचा कचरा ऐरोली जकात नाक्यावर -

मंड्याचा पुनर्विकास करताना मुंबई महापालिका मंड्यातील कचरा ऐरोली जकात नाक्याच्या अंशतः भूभागावर सेंद्रीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात विल्हेवाट लावली जात असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in