कासारवाडी वसाहतींचा पुनर्विकास रखडणार

स्थायी समितीने विरोध केल्याने या पुनर्विकासाचा प्रस्ताव कायमचा रद्द करण्यात आला.
कासारवाडी वसाहतींचा पुनर्विकास रखडणार
Published on

मुंबई : दादर येथील सफाई कामगारांच्या कासारवाडी वसाहतींचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुनर्विकासाचा तत्कालीन स्थायी समितीने फेटाळला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसाहतींची पहाणी करत नव्याने निविदा मागवत पुनर्विकास होईपर्यंत वसाहतींची दुरुस्ती करा असे निर्देश दिले होते. त्यामुळे वसाहतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या आहेत.

दादर कासारवाडी व प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी दोन वर्षांपूर्वी कंत्राटदार निश्चित करण्यात आला होता. विविध करांसह ४७८ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. या वसाहतीत ४५९ सदनिका असून पुनर्विकासात ९८ हजार २९ चौरस मीटर क्षेत्रफळात ३०० चौरस फुटांच्या १३९९ सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या १४५ सदनिका पालिकेने प्रस्तावित केल्या होत्या. कंत्राटदाराने लावलेल्या बोलीमध्ये ३०० चौरस फुटाच्या १५९७ आणि ६०० चौरस फुटाच्या १८० सदनिका बांधून देण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र स्थायी समितीने विरोध केल्याने या पुनर्विकासाचा प्रस्ताव कायमचा रद्द करण्यात आला. मात्र आता वसाहतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

दुरूस्ती खर्च

जे. के. सावंत मार्ग कासारवाडी चाळ क्र. ८

९९ लाख ६३ हजार

जे. के. सावंत मार्ग कासारवाडी चाळ क्र. ९

४५ लाख ७४ हजार

पद्माबाई ठक्कर रोड, दादर

३५ लाख ५३ हजार

logo
marathi.freepressjournal.in