धारावीत पुनर्विकासाला गती; बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

धारावीचा पुनर्विकास होणार असून, १८ मार्चपासून घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे...
धारावीत पुनर्विकासाला गती; बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

मुंबई : धारावीचा पुनर्विकास होणार असून, १८ मार्चपासून घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे याठिकाणी असलेल्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. धारावीतील चमडा बाजार येथील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

धारावीत सध्या अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफावली असून, कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे बांधली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता राजेश राठोड यांच्यासह महापालिकेचे पाच अभियंते, ५० कामगार, दोन गॅसकटरच्या माध्यमातून धारावी व शाहू नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या संरक्षणात बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in