दोन प्रभारी आरोग्य संचालकांवरील अतिरिक्त भार कमी

डॉ. नितीन अंबाडेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता
दोन प्रभारी आरोग्य संचालकांवरील अतिरिक्त भार कमी

मुंबई : राज्य सरकारच्या आरोग्य संचालकपदी अतिरिक्त भार दिलेल्या दोन संचालकांचा पदभार राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काढून घेतला आहे. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.

डॉ. स्वप्नील लाळे यांनी गेल्या वर्षअखेरीस आरोग्य संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता. तर डॉ. नितीन अंबाडेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. पदावरून हटवण्याबाबत डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की, “पदावरून हटवलेले नाही. माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी होती. आता पुन्हा राज्यात असलेल्या मानसिक समस्येवर काम करायचे आहे. टेलिमानस, इतर सुविधांचे अपग्रेडेशन आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून पुन्हा काम करायचे आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in