सर्वोदय नगर वसाहतींचे पुनर्वसन गोरेगावलाच करा, भाजप नगरसेविकेची मागणी

त्यामुळे रहिवासी व व्यावसायिक गाळे धारकांमध्ये भीती व अस्वस्थता निर्माण झाली आहे
सर्वोदय नगर वसाहतींचे पुनर्वसन गोरेगावलाच करा, भाजप नगरसेविकेची मागणी

मुंबई : गोरेगाव पूर्व द्रुतगती महामार्गालगत जवळपास ३०० रहिवासी घरे तर वाणिज्यिक गाळे असलेली ५० वर्षे जुनी वसाहत आहे. महामार्गाच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची नोटीस पालिका प्रशासनाने बजावली आहे. त्यामुळे रहिवासी व व्यावसायिक गाळे धारकांमध्ये भीती व अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वसाहतींचे पुनर्वसन गोरेगाव पश्चिमेला करण्यात यावे, या मागणीसाठी पी. दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांची भेट घेत निवेदन दिल्याचे भाजपच्या प्रभाग क्रमांक ५२ च्या स्थानिक माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी सांगितले.

याआधी येथील वसाहतींचे केलेले सर्वेक्षण, याअगोदर दिलेले नंबर व होणारे प्रस्तावित पुनर्वसन, याबाबत कोणतीही माहिती न देता सरसकट नोटिसा देऊन ५० वर्षापासून या ठिकाणी राहणारे नागरिक तसेच याच परिसरात राहून व्यवसाय करून करणारे व्यावसायिक यांना विस्थापित करणे, हे अन्यायकारक आहे. याची गांभीर्याने दखल घेत रहिवाशांच्या प्रतिनिधींसह पी. दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांची भेट घेऊन सर्व रहिवासी व व्यवसायिकांचे पुन:सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन गोरेगाव पश्चिमेला करावे, असे निवेदन प्रीती सातम यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in