मलनि:सारण वाहिन्यांचे होणार मजबुतीकरण; ९०० मिमी व्यासाच्या वाहिन्या टाकणार, ६०० कोटी रुपये खर्च करणार

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून त्याच गतीने आता मूलभूत सुविधा वाढवण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.
मलनि:सारण वाहिन्यांचे होणार मजबुतीकरण; ९०० मिमी व्यासाच्या वाहिन्या टाकणार, ६०० कोटी रुपये खर्च करणार

मुंबई : मुंबईचा विकास झपाट्याने होत असून त्याच गतीने आता मूलभूत सुविधा वाढवण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मुंबईत मलनिःसारण जल वाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासह मजबुतीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मलनि:सारण प्रचलन विभागामार्फत शहर आणि उपनगरात २२५ ते ९०० मिमी व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या नव्याने टाकल्या जाणार आहेत. तसेच नवीन मलनि:सारण वाहिन्यांची जोडणी, एकत्रीकरण अशा विविध स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ६०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत सुमारे २ हजार २६ किलोमीटर लांबीचे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे आहे. मुंबईतील बहुतांश मलनि:सारण वाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. जीर्ण झालेल्या मलनिःसारण वाहिन्या बदलत नवीन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे विस्तारले जाईल आणि वाहिन्यांचे मजबुतीकरण होईल, असा विश्वास पालिकेच्या मलनिःसारण जल वाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in