चार वर्षांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी नातेवाईकाला अटक, प्रयागराज रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई

कुर्ला येथून अपरहरण केल्यानंतर त्याने या मुलाला उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्याला प्रयागराज रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केली.
चार वर्षांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी नातेवाईकाला अटक, प्रयागराज रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई

मुंबई : चार वर्षांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी लव तुफानी विश्वकर्मा या आरोपीला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. कुर्ला येथून अपरहरण केल्यानंतर त्याने या मुलाला उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्याला प्रयागराज रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कुर्ला येथे राहणाऱ्या विजय छेदीप्रसाद विश्वकर्मा यांना रुद्रांश नावाचा एक चार वर्षांचा मुलगा आहे. आरोपी लव हा त्यांच्या भावाचा मेहुणा आहे. त्यांच्यातील कौटुंबिक वादामु‌ळे लवने रुद्रांशचे २२ फेब्रुवारीला अपहरण केले होते. त्याला खाऊ आणि आईस्क्रीम देण्याचा बहाणा करून महानगरी एक्स्प्रेसमधून उत्तर प्रदेशाला नेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच विजय विश्वकर्मा यांनी विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून लव हा रुद्रांशसोबत उत्तर प्रदेशला जात असल्याचे लक्षात आले होते. ही एक्स्प्रेस प्रयागराज रेल्वे स्थानकात येताच पोलिसांनी लव विश्वकर्माला ताब्यात घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in