उत्सवासाठी रिलायन्स ज्वेल्सचे महालय कलेक्शन लाँच

ज्वेलरी डिझाइन्सच्या माध्यमातून भारतातील वैविध्यपूर्ण वारसा सातत्याने सर्वांसमोर आणला आहे
उत्सवासाठी रिलायन्स ज्वेल्सचे महालय कलेक्शन लाँच

रिलायन्स ज्वेल्स हा भारतातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड, भारताच्या समृद्ध व वैविध्यपूर्ण वारसा दर्शविणाऱ्या विविध कला व संस्कृती, परंपरांपासून प्रेरित झालेल्या अनेक कलेक्शन्ससाठी प्रसिद्ध आहे. ओदिशापासून प्रेरित उत्कला, बनारसपासून प्रेरित कास्यम आणि कच्छपासून प्रेरित रणकारपर्यंत रिलायन्स ज्वेलन्सने आपल्या ज्वेलरी डिझाइन्सच्या माध्यमातून भारतातील वैविध्यपूर्ण वारसा सातत्याने सर्वांसमोर आणला आहे.

या नव्याकोऱ्या कलेक्शनबद्दल रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ सुनिल नायक म्हणाले, या उत्सवी हंगामाच्या निमित्ताने रिलायन्स ज्वेल्सने त्यांचे सोन्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांचे उत्कृष्ट कलेक्शन लाँच केले आहे. महालय असे या कलेक्शनचे नाव असून आगामी शुभ व सणासुदींच्या हंगामाच्या औचित्याने महाराष्ट्राचे वैभव व रुबाबापासून हे कलेक्शन प्रेरित आहे. महालय हा शब्द महानता आणि सौंदर्य या दोन शब्दांच्या संधीने तयार झाला आहे. महा म्हणजे महान आणि आलय म्हणजे सौंदर्य, जे महाराष्ट्राच्या प्रत्येक पैलूमध्ये भरलेले आहे.

केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या एका भव्य कार्यक्रमात हे कलेक्शन लाँच करण्यात आले. या कार्यक्रमात रिलायन्स ज्वेल्सने एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी शो आयोजित केला होता, ज्याची शोस्टॉपर जेनेलिया देशमुख होती. या निमित्ताने अभ्यागतांना रिलायन्स ज्वेल्सच्या नव्या कोऱ्या महालय कलेक्शनचा जवळून आणि एक्सक्लुझिव्ह प्रिव्ह्यू पाहता आला. महालय कलेक्शनमधील रॉयल रिगालियापासून (शाही चिन्हे) प्रेरित भरझरी नेकलेस सेटमध्ये जेनेलिया अत्यंत सुंदर दिसत होती. हा नेकलेस म्हणजे राजदरबार आणि राज्याभिषेकाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या डिझाइन्सच्या आकृतीबंधाचा खजिना होता.

नवी दागिने घेण्यासोबतच ग्राहकांना सोन्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांच्या मूल्यावर घडणावळीत २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. हे कलेक्शन भारतभरातील रिलायन्स ज्वेल्सची फ्लॅगशिप शोरूम आणि निवडक श्रेणी रिलायन्स ज्वेल्सच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे अनेक पैलू या भागाचा रुबाब व वैभव दर्शवतात, जे जवळपास प्रत्येक पैलूमध्ये आणि समृद्ध वारशामध्ये दिसून येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in