रिलायन्स रिटेलची गॅप आयएनसीबरोबर दीर्घकालीन भागीदारी

करारामुळे अमेरिकन फॅशन ब्रँड भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिलायन्स रिटेलची गॅप आयएनसीबरोबर दीर्घकालीन भागीदारी

भारतातील सर्वात मोठी रिटेलर रिलायन्स रिटेल लि.ने बुधवारी जाहीर केले की, त्यांनी गॅप आयएनसीबरोबर धोरणात्मक दीर्घकालीन भागीदारी केली आहे. या करारामुळे अमेरिकन फॅशन ब्रँड भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या फ्रॅन्चायजी करारामुळे रिलायन्स रिटेल आता गॅपसाठी अधिकृत भारतातील रिटेलर झाला आहे. आता देशभरात गॅपचे आधुनिक फॅशनेबल कपडे भारतीय ग्राहकांना उपलब्ध होतील. ते एक्सक्लुसिव्ह ब्रँड स्टोअर, मल्टी-ब्रँड स्टोअर एक्सप्रेशन्स आणि डिजिटल कॉमर्स मंचावर उपलब्ध असतील, असे रिलायन्स रिटेलने म्हटले आहे.

गॅपची स्थापना १९६९ मध्ये सॅनफ्रान्सिसको येथे झाली. गॅपची डेनिमसह अनेक फॅशनेबल कपडे ग्राहकांना ऑनलाईन आणि जगभरातील कंपनीच्या फ्रँचायझी रिटेल स्टोअरमधून उपलब्ध आहेत. मुले, तरुण, तरुणी, महिला आणि पुरुषांसाठी फॅशनेबल कपडे रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून आता भारतात उपलब्ध होतील, असे असे अखिलेश प्रसाद, सीईओ, फॅशन ॲण्ड लाईफस्टाईल, रिलायन्स रिटेल यांनी सांगितले.

तर आमचा गॅपचा व्यवसाय जभरातील बाजारपेठेत वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ॲड्रिनी गेरांड, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इंटरनॅशनल, ग्लोबल लायझनिंग ॲण्ड होलसेल, गॅप आयएनसी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in