रिलायन्स स्टोअरमधून १३.३९ लाखांचे कपडे चोरले; चौघांना अटक

कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील रिलायन्स ट्रेंड्स स्टोअरमधून १३.३९ लाख रुपये किमतीचे ब्रँडेड कपडे चोरल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
रिलायन्स स्टोअरमधून १३.३९ लाखांचे कपडे चोरले; चौघांना अटक
Published on

मुंबई : कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील रिलायन्स ट्रेंड्स स्टोअरमधून १३.३९ लाख रुपये किमतीचे ब्रँडेड कपडे चोरल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांची नावे अल्ताफ अब्दुल गफूर शेख (२७, रहिवासी मंगळुरू, कर्नाटक), सचिन सुरेश हिवळे (२६), अभिषेक पंकज सिंह (३५, दोघेही रहिवासी कुर्ला-पश्चिम) आणि साजिद इक्बाल शेख (२६) अशी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्ताफ शेख व सचिन हिवळे यांच्यावर ग्राहकांना कपडे निवडण्यात मदत करण्याची जबाबदारी होती, तर अभिषेक सिंह याची मुख्य प्रवेशद्वारावर ग्राहकांच्या बिल आणि खरेदी तपासणी करण्याची जबाबदारी होती.

दुकान बंद झाल्यानंतर अल्ताफ शेख व सचिन हिवळे हे मोठ्या निळ्या जंबो पिशवीत कपडे भरताना आणि ती पिशवी त्यांच्या ओळखीच्या साथीदाराकडे देताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.

logo
marathi.freepressjournal.in