चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना दिलासा

एमबीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबवण्यात येत आहे.
चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना दिलासा
PTI
Published on

मुंबई : एमबीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबवण्यात येत आहे. मात्र प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात चुकीची टक्केवारी नोंदवल्याचे समोर आले आहे. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सीईटी कक्षाकडून विद्यार्थ्यांना अचूक टक्के भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए या पदवी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला थेट प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए लॅटरल एन्ट्री (थेट द्वितीय वर्षासाठी) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून २५ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमांचा निकाल सीजीपीए पद्धतीने (ग्रेड पद्धत) जाहीर करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in