Mumbai Railway Update : मुंबईकर प्रवाशांना दिलासा; तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

यंदाच्या रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Mumbai Railway Update : मुंबईकर प्रवाशांना दिलासा; तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

मुंबई : विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. परंतु रविवार, २५ फेब्रुवारी रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी दर रविवारी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक अर्थात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. परंतु यंदाच्या रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in