ज्येष्ठांसह गरोदर महिलांना दिलासा; हिमालय पुलावर ये-जा करण्यासाठी सरकते जिने काम अंतिम टप्प्यात, लवकरच प्रवासी सेवेत

हिमालय पूल प्रवाशांच्या सेवेत आल्याने सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्ग सबवेतून ये-जा करण्याचे कमी झाले आणि वळसा वाचला.
ज्येष्ठांसह गरोदर महिलांना दिलासा; हिमालय पुलावर ये-जा करण्यासाठी सरकते जिने 
काम अंतिम टप्प्यात, लवकरच प्रवासी सेवेत

मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पुलावर सरकते जिने बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवासी सेवेत दाखल होईल. सरकते जिने कार्यान्वित झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या पूल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

१४ मार्च २०१९ रोजी तो कोसळला. या दुर्घटनेत ४ मृत्यू, तर ३१ जखमी झाले होते.‌ या दुर्घटनेनंतर नव्याने पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी तब्बल ७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आणि पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. मे २०२३ मध्ये हिमालय पूल प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आला. परंतु सरकते जिने नसल्याने ज्येष्ठ नागरिक महिला प्रवाशांची गैरसोय होत होती. आता सरकते जिने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावर छप्पर उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सरकते जिने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना या पुलावरून वावर करणे सुलभ होणार आहे.

पुलामुळे वळसा वाचला

हिमालय पूल प्रवाशांच्या सेवेत आल्याने सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्ग सबवेतून ये-जा करण्याचे कमी झाले आणि वळसा वाचला. त्यात सरकते जिने विशेष करून ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर दिलासा मिळेल, असा विश्वास ज्योती पाटील यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in