केमोथेरपीच्या मरणयातनांतून लहानग्यांची सुटका, भारतात पहिल्यांदाच तोंडावाटे दिली जाणार 'ही' गोळी

कर्करोगाचे प्रमाण देशात वाढत आहे. या दुर्धर आजारावर उपचार करताना रुग्णांना केमोथेरपीच्या वेदना सहन कराव्या लागतात. लहान रुग्ण असो वा मोठा त्यांना या मरणयातनांना सामोरे जावे लागते.
केमोथेरपीच्या मरणयातनांतून लहानग्यांची सुटका, भारतात पहिल्यांदाच तोंडावाटे दिली जाणार 'ही' गोळी

मुंबई : कर्करोगाचे प्रमाण देशात वाढत आहे. या दुर्धर आजारावर उपचार करताना रुग्णांना केमोथेरपीच्या वेदना सहन कराव्या लागतात. लहान रुग्ण असो वा मोठा त्यांना या मरणयातनांना सामोरे जावे लागते. भारतात पहिल्यांदाच लहान मुलांना तोंडावाटे ‘मरकॅप्टोप्युरिन’ (६ एमपी) ही केमोथेरपीची गोळी दिली जाणार आहे. त्यामुळे केमोथेरपीच्या वेदनातून लहानग्या कर्करोगग्रस्तांची सुटका होणार आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉक्टर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, नवी मुंबई यांनी आरडीआरएस लॅब, बंगळुरू यांनी ही गोळी विकसित केली. ‘६-एमपी’ ही केमोथेरपीची गोळी असून ती रक्ताच्या कर्करोगावर उपयुक्त ठरते. हा कर्करोग लहान मुलांमध्ये आढळतो. या आजारावर पावडरच्या रूपात तोंडावाटे औषध दिले जाते. या औषधाचे नाव ‘प्रीवॉल’ आहे. हे औषध १०० मिलीचे असून ते तोंडावाटे घ्यायचे असते. त्याच्या सोबत सिरिंज आणि प्रेस इन बॉटल अडॅप्टर असते जे रुग्णाच्या शरीराचे वजन किंवा शरीराच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रानुसार अचूक डोस देण्यास अनुमती देते. तसेच सायटोटॉक्सिक संयुगे गळती आणि काळजी घेणाऱ्यांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील कमी करतात.

‘प्रीवॉल’ औषध हे कर्करोग उपचारांमध्ये मैलाचा दगड ठरले आहे. डोसची अचूकता, लवचिकता आणि सहनशीलता या संदर्भात सध्याच्या टॅब्लेट फॉर्म्युलेशनच्या अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आत्तापर्यंत, मुलांमध्ये डोसची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी टॅब्लेटची पावडर बनवणे किंवा पर्यायी डोस करणे आदी पद्धतींचा अवलंब केला जात होता. या औषधाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटनेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘प्रीवॉल’ या औषधाची सुरक्षितता कळून येते. त्यातून डॉक्टर व रुग्णांना आरोग्यदायी उपचारांची हमी देते. टाटा मेमोरियल सेंटर व आरडीआरएस लॅब, बंगळुरू यांनी या औषधांच्या क्लीनिकल चाचण्यांचा अभ्यास ‘पीडीऑट्रिक ब्लड ॲॅण्ड कॅन्सर’ या नियतकालिकात संयुक्तपणे प्रकाशित केला आहे.

टाटा बाल कर्करोग विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. गिरीश चिन्नास्वामी म्हणाले की, आजारातून बरी करता येण्याजोगी कर्करोगग्रस्त मुले सर्व शक्य तितक्या चांगल्या काळजी घेण्यास पात्र आहेत आणि ‘प्रीवॉल’ सारखी औषधे प्रभावीपणे काम करत आहेत.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शिक्षण) डॉ. एस. डी. बनावली म्हणाले की, ‘प्रीवॉल’ हे बाल कर्करोगासाठी महत्वपूर्ण औषध ठरले आहे. ‘६-मरकॅप्टोप्युरिन’ हे द्रव्यरुपात युरोप व अमेरिकेत अनेक वर्षांपासून वापरले जाते. आता भारतासारख्या विकसनशील देशात ते उपलब्ध झाले आहे.

टाटा मेमोरियल संशोधनासाठी कटिबद्ध

टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले की, संशोधन क्षेत्र व उद्योगांच्या समन्वयामुळे नवीन प्रभावी औषधे जन्माला येतात. टाटा मेमोरियल सेंटर हे नावीन्यपूर्ण शोधासाठी कटिबद्ध आहेत. ‘सीएआर-टी’ सेल थेरपी ही टाटा मेमोरियलने शोधून काढली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in