मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी खडसे यांना दिलेले अंतरिम सरंक्षण कायम ठेवत सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.
 मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा  दिलासा

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा १६ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवला आहे. न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर मंदाकिनी खडसे या ईडीला तपासात सहकार्य करीत आहेत. वेळोवेळी चौकशीला सामोरे जात असल्याची माहिती अ‍ॅड. मोहन टेकवडे यांनी न्यायालयाला दिला. याची दखल घेत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी खडसे यांना दिलेले अंतरिम सरंक्षण कायम ठेवत सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सर्व्हे क्र. ५२-२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in