अनिल परब यांना जानेवारी अखेरपर्यंत दिलासा ;ईडीला कठोर कारवाई न करण्याचे आदेश कायम

दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात ईडीने स्थानिक व्यावसायिक सदानंद कदम यांना अटक केली.
अनिल परब यांना जानेवारी अखेरपर्यंत दिलासा 
;ईडीला कठोर कारवाई न करण्याचे आदेश कायम

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना यापूर्वी मुंबई हायकोर्टाने अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याचा दिलेला आदेश जानेवारी अखेरपर्यंत वाढवला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. सी. चांडक यांच्या खंडपीठाने यापूर्वी हायकोर्टाने परब यांना अटकेपासून दिलेले संरक्षण कायम ठेवत सुनावणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निश्‍चित केली.

दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात ईडीने स्थानिक व्यावसायिक सदानंद कदम यांना अटक केली. त्यानंतर ईडीने सुरू केलेल्या चौकशी आणि कारवाईविरोधात अनिल परब यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. सी. चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने अ‍ॅड. एस. व्ही. राजू यांनी परब यांच्या याचिकेलाच जोरदार आक्षेप घेत दापोली पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात, हस्तक्षेप करणारी काही कागदपत्रे सादर केली. यावेळी अनिल परब यांच्या वतीने त्याला उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागण्यात आला. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी आठ आठवडे तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in