दुहेरी हत्याकांडप्रकरणी चिंतन उपाध्यायला दिलासा

खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावून सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली
दुहेरी हत्याकांडप्रकरणी चिंतन उपाध्यायला दिलासा

मुंबई : संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडवून दिलेल्या हेमा उपाध्याय आणि अ‍ॅड.हरिष भंबानी दुहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कलाकार चिंतन उपाध्यायला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने चिंतन उपाध्यायने दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातील अपील दाखल करून घेताना जामिन अर्जाची दखल घेत प्रतिवादींना नोटीस बजावून सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्‍चित केली.

कलाकार चिंतन उपाध्यायला विभक्त पत्नी हेमा व तिचे वकिल हरीश भंबानी या दोघांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेला चिंतन उपाध्यायने उच्च न्यायालयात आव्हान देत अपील प्रलंबित असेपर्यंत जामीन मंजूर करण्याची विनंती केली. या अपीलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी चिंतन उपाध्यायच्या जामीन अर्जाला अ‍ॅड. हरिष भंबानी यांच्या पत्नीच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. सुभाष लाला यांनी जोरदार आक्षेप घेण्यात आला. याची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावून सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in