राज्‍यातील अतिवृष्‍टीग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा,एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देणार

अतिवृष्‍टीने राज्‍यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्‍यात सुमारे १५ लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे.
राज्‍यातील अतिवृष्‍टीग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा,एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देणार

राज्‍य मंत्रिमंडळाच्या विस्‍तारानंतरची पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. राज्‍यातील अतिवृष्‍टीग्रस्‍त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्यात येणार असून, मदतीसाठीची दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीन हेक्‍टर करण्यात आली असल्‍याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यामुळे आता पूरग्रस्‍त शेतकऱ्यांना हेक्‍टरी १३ हजार ६०० रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

 अतिवृष्‍टीने राज्‍यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्‍यात सुमारे १५ लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. काही ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर काही ठिकाणी सुरू आहेत. या नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमच्या शिवसेना आणि भाजप सरकारने निर्णय घेतला असून, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तसेच भरपाईसाठी दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीन हेक्‍टर करण्यात आली असल्‍याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेक्‍टरी मिळणार १३ हजार ६००

एनडीआरएफच्या निकषानुसार सध्या हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये इतकी नुकसानभरपाई सरकारतर्फे देण्यात येते. ती आता दुप्पट केल्‍याने हेक्‍टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार आहे. तसेच दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीदेखील तीन हेक्‍टर करण्यात आल्‍याने नुकसानग्रस्‍त शेतकऱ्याला जास्‍त दिलासा मिळू शकणार आहे.

तोंडाला पानं पुसण्याचे काम

अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे, शेतजमिनींचे तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले आहेत. सरकारने दुप्पट मदत जाहीर करूनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. - अजित पवार, विरोधी पक्षनेते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in