पेडणेकर यांना दिलासा कायम ;जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पेडणेकर यांना दिलासा कायम ;जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सोमवारी मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवला. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीनअर्जाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

कोरोना महामारीत बॉडी बॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले आहे, असा दावा करत पेडणेकर यांनी अ‍ॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज गेल्या आठवड्यात सत्र न्यायाधिश एस. बी. जोशी यांनी फेटाळून लावला. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली.

या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने पेडणेकर यांना ईओडब्ल्यूच्या तपासात सहकार्य म्हणून ११, १३ आणि १६ सप्टेंबर या तीन दिवशी चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश देत सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली. तसेच या चौकशीदरम्यान जर अटकेची आवश्यकता भासल्यास, ३० हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला दिले होते. हे आदेश कायम ठेवत अटकपूर्व जामीनअर्जाची सुनावणी २० डिसेंबर रोजी निश्‍चित केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in