मध्य रेल्वेची उल्लेखनीय आर्थिक कामगिरी

मध्य रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मजबूत आर्थिक शिस्त आणि वचनबद्धता दाखवली आहे.
मध्य रेल्वेची उल्लेखनीय आर्थिक कामगिरी
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : मध्य रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मजबूत आर्थिक शिस्त आणि वचनबद्धता दाखवली आहे. यामुळे विविध प्रमुख कामगिरी निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६७९ कोटी रुपयांच्या तुलनेत १,२५० कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आहे. ती ५७१ कोटी रुपयांची वाढ दर्शवते, असे नमूद करण्यात आले आहे. तर या कामगिरीमुळे मध्य रेल्वेची कार्यक्षमता, आर्थिक सावधगिरी आणि प्रवासी-केंद्रित पायाभूत सुविधा वाढवण्याची वचनबद्धता अधोरेखित होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वेची गुंतवणूक आणि उत्पन्नात सातत्याने होणारी वाढ रेल्वे क्षेत्रातील वाढ आणि विकासाला चालना देण्यात महत्त्वाच्या भूमिकेला बळकटी देते असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

महसूल वाढ आणि खर्च कार्यक्षमता

- कार्यक्षम कामकाज आणि महत्त्वाचे खर्च नियंत्रण उपायांमुळे, महसूल खर्चातील वाढ मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ५.१८% पर्यंत मर्यादित राहिली.

- भांडवली खर्चाचे (CAPEX) केंद्रित निरीक्षण, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.८४% वाढ झाली.

- एकूण उत्पन्नात १.८३% ची स्थिर वाढ दिसून आली.

पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक

- पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देत, भांडवली खर्चात २०,८९४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९.८४% वाढ झाली आहे.

- प्रमुख क्षेत्रांमध्ये खर्चात लक्षणीय वाढ :

- गेज रूपांतरण : गेल्या वर्षीपेक्षा ४९% अधिक

- वाहतूक सुविधा : ५४% ने वाढ

- पुलाचे बांधकाम : ८६% वाढ

logo
marathi.freepressjournal.in