'पुजारी हटाव, मंदिर बचाव'भाविकांचा उपोषणाचा इशारा

चेंबूर घाटला येथील एका प्रसिद्ध मंदिरातील पूजारी मंदिराची मालमत्ता मनमानीपणे वापरत असून, आर्थिक व्यवहारही मनमानी पद्धतीने करत आहे.
'पुजारी हटाव, मंदिर बचाव'भाविकांचा उपोषणाचा इशारा

मुंबई : मंदिराला मिळणारे आर्थिक स्वरूपाचे दान, सोने व इतर स्वरूपातील देणगी मनमानी खर्च करणे, महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, मंदिरात नशापान करणे , मारहाण करणे या व इतर मनमानी कारभार करणाऱ्या चेंबूर येथील एका मंदिरातील गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून, या पुजाऱ्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी घेऊन चेंबूर येथील भाविकांनी आज उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

चेंबूर घाटला येथील एका प्रसिद्ध मंदिरातील पूजारी मंदिराची मालमत्ता मनमानीपणे वापरत असून, आर्थिक व्यवहारही मनमानी पद्धतीने करत आहे. एका पुजाऱ्याची मालमत्ता किती असावी, याबाबत माहिती घेतली असता, पोलीसही चक्रावून गेले आहेत. भाविक ज्या समाजाचे आहेत, त्या समाजाचे नेते व आमदार या पुजाऱ्याच्या पाठीशी आहेत, म्हणून त्याचे कोणी वाकडे करू शकत नाही, असा आरोप भाविक करत आहेत.

पालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक, आमदार, पोलीस स्टेशन, धर्मदाय आयुक्त कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आदी सर्व ठिकाणी या प्रकरणी पुजाऱ्याविरोधात तक्रार करूनही काही फरक नाही. जो भाविक त्याला विरोध करतो त्याला मारहाण करण्यात येते. धर्मदाय आयुक्त कार्यालय वरळी या ठिकाणी बोगस हिशोब सादर केले जातात, असा आरोप स्थानिक भाविकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या तक्रारीची दखल घ्यावी, नाहीतर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाविकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in