
महाविकास आघाडी सत्तेत असताना मालाडमधील क्रीडा संकुल तथा उद्यानाचे नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. तत्कालीन पालकमंत्री असलम शेख यांच्या या निर्णयाला भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी याचा आंदोलने करत विरोध केला होता. मात्र, आता सध्याचे मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टिपू सुलतान हे नाव हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट केले की, "अखेर आंदोलन यशस्वी झाले आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाडमधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहेत"