अखेर घाटकोपर जलतरण तलावाचे नुतनीकरण ;शूटिंग रेंजसह अत्याधुनिक क्रीडा संकुल

हा जलतरण तलाव नागरिकांना पोहोण्यासाठी तसेच विवाह आणि इतर कार्यक्रमांसाठी ही जागा दिली जात असे.
अखेर घाटकोपर जलतरण तलावाचे नुतनीकरण
;शूटिंग रेंजसह अत्याधुनिक क्रीडा संकुल
PM

मुंबई : घाटकोपर पूर्व येथील जलतरण तलावाच्या नुतनीकरणाला मुहूर्त सापडला आहे. ऑलिम्पिक दर्जा, अत्याधुनिक क्रीडा संकुलसह शूटिंग रेज असलेला जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिका तब्बल ८४ कोटी ३१ लाख रुपये खर्चणार आहे.

घाटकोपर पूर्वेला ओडियन मॉल, आर. एन. नारकर मार्गावर १९७१ साली जलतरण तलाव बांधण्यात आला. हा जलतरण तलाव नागरिकांना पोहोण्यासाठी तसेच विवाह आणि इतर कार्यक्रमांसाठी ही जागा दिली जात असे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जलतरण तलावाला गळती लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुमारे एक कोटींहून अधिक खर्च दुरुस्तीवर केला. परंतु ही समस्या कायमच उद्भवत असल्याने २०१९ पासून हा तरणतलाव बंद करण्यात आला होता. त्यामुळे घाटकोपरमधील नागरिकांना पोहोण्यासाठी चेंबूर येथील जलतरण तलावात जावे लागते आहे. या जलतरण तलावाची पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा मागवल्या असून नवीन रचनेत पाच मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यात पाचव्या मजल्यावर हा जलतरण तलाव उभारला जाणार आहे. मूळ जलतरण तलाव हा अर्ध-ऑलिम्पिक म्हणजे २५ मीटर लांबीचा होता. प्रस्तावित जलतरण तलाव ऑलिम्पिक आकाराचा ५० मीटर लांबीचा व १० लेनचा असेल. वास्तुविशारद शशांक मेहेंदळे यांनी या प्रकल्पाचे डिझाईन तयार केले आहे. पालिकेने गुरुवारी या प्रकल्पासाठी निविदा मागवली आहे.

असा आहे प्रकल्प

पाच मजली इमारतीत पाचव्या मजल्यावर तरण तलाव प्रस्तावित

आधुनिकीकरणात जलतरण तलाव परिसरात क्रीडा संकुल उभारण्यात येणार

नेमबाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेचे पहिले शूटिंग रेंज बांधले जाणार

संकुलात बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, स्क्वॉश, बुद्धिबळ, कॅरम खेळण्याची सुविधा उपलब्ध होणार

logo
marathi.freepressjournal.in