‘रेंट अ गरबा पार्टनर’ ॲपवर बंदी घाला; आमदार मेहतांची मागणी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘रेंट अ गरबा पार्टनर’ या नावाने समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या जाहिरातींविरोधात आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्षेप नोंदवला आहे.
‘रेंट अ गरबा पार्टनर’ ॲपवर बंदी घाला; आमदार मेहतांची मागणी
Published on

भाईंंदर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘रेंट अ गरबा पार्टनर’ या नावाने समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या जाहिरातींविरोधात आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्षेप नोंदवला आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर एक हजार ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारून गरबा पार्टनर उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेऊन केली.

संबंधित ॲप तातडीने बंद करून जाहिरात करणारे आणि ॲपच्या निर्मात्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नागरिकांनी अशा ऑनलाइन जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in