मालाडमधून सात बारबालांची सुटका

रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू राहत असून तिथे ग्राहकांसोबत बारबाला अश्लील चाळे करत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.
मालाडमधून सात बारबालांची सुटका

मुंबई : मालाड येथील काका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाने छापा टाकून मॅनेजरसह नऊ जणांना अटक केली तर सात बारबालांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू राहत असून तिथे ग्राहकांसोबत बारबाला अश्लील चाळे करत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या माहितीनंतर अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिंडोशी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री साडेबारा वाजता तिथे छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करताना दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी गायिका म्हणून काम करणाऱ्‍या सात बारबालांची सुटका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in