गोवंडीत सहा बालकामगार मुलांची सुटका

बॅग आणि टोपी बनविण्याच्या कारखान्यात छापा टाकला होता
गोवंडीत सहा बालकामगार मुलांची सुटका

मुंबई : गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात असलेल्या बॅग आणि टोपी बनविण्याच्या कारखान्यात शनिवारी शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी पंधरा ते सतरा वयोगटातील सहा बालकामगार मुलांची सुटका केली. या मुलांना जबदस्तीने तिथे काम करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कारखान्याच्या दोन मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. कयामुद्दीन हाजी इसराईल शेख आणि मोहम्मद मुबारक मोहम्मद कादिर अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत.

अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने प्लॉट ३३ च्या बॅग आणि टोपी बनविण्याच्या कारखान्यात छापा टाकला होता. यावेळी कारखान्याचे मालक असलेल्या कयामुद्दीन शेख आि मोहम्मद मुबारक अन्सारी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी सहा अल्पवयीन बालमजुर कामगार सुटका केली. पंधरा ते सतरा वयोगटातील ते सर्व मुले बिहारच्या मधुबनीचे रहिवाशी असून या सर्वांना मुंबईत कामासाठी आणण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in